भाजपच्या नाशिक मध्य मतदार संघाच्या आमदार देवयानी फरांदे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.
2014 मध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या देवयानी यांना यावेळी स्वपक्षातूनच तीव्र आव्हानाला सोमोरे जावे लागत आहे. मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेवर गिते यांच्या उमेदवारीचा विचार होण्याची शक्यता आहे.
2014 च्या निवडणूकामध्ये देवयांनी फरांदे यांनी 61,548 मतांनी विजय मिळवला तर, त्यावेळी मनसेत असलेल्या वसंत गिते यांनी 33,276 मतं मिळाली होती. परंतू सध्याची परिस्थिती पाहता गिते यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश केला आहे. गिते यांचा मतदार संघात प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजप कडून उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्यता आहे.
फरादे आणि गिते यांच्या उमेदवारी मध्ये चढाओढ सुरू असताना, डॉ अहिरेंचा राजकीय वारसा आणि गिरीष महाजन यांचा विश्वास अशा जमेच्या बाजूमुळे, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके या देखील उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत. आता या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच सगळ्यांच लक्ष लागलं आहे.