पुणे रायगड रस्त्यावरील ताम्हिणी घाटात प्रचंड खड्डे पडले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पर्यटकांची संख्या जास्त असते. या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून, या रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आपल्या व्टिटर अकाऊंटवरून त्यांनी या प्रश्नाची मांडणी केली .
https://twitter.com/supriya_sule/status/1153881483108442114