ममता बॅनर्जींचा आक्षेपार्य फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली आहे. सुटल्यानंतर प्रियांका शर्मानी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टानी मला काल जामीन मंजूर करून देखील कोर्टाच्या आदेशाच्या १० तासनानंतरही माझी सुटका झाली नाही. मला माझ्या कुटुंबाना आणि वकिलांना ही भेटू दिलं नाही. वेळोवेळी मला माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला असं शर्मा यांनी सांगितलं.
https://twitter.com/ANI/status/1128551670991020032