पर्वती विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा भाजपने माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडुन नगरसेविका अश्विनी कदम यांना त्यंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी टक्कर असल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले होते. माधुरी मिसाळ या पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत.