हिंदूंपेक्षा मुस्लीमांना जास्त जागा का? आयोध्या निकालावर लेखिका तस्लीमा नसरीन यांचा वादग्रस्त सवाल

Update: 2019-11-11 11:38 GMT

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे देशातील जनतेने सामंजस्याने स्वागत केले. सर्व स्तरातून या निर्णयाबाबत कौतुक करण्यात आले. मात्र, आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून नेहमी चर्चेत असणाऱ्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आयोध्या निकालावर वादग्रस्त टीपण्णी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे आणि इतरत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबत बोलताना तस्लीमा नसरीन म्हणाल्या की, २.७७ एकर जमीन हिंदूंना मंदिरासाठी देण्यात येत आहे तर मुस्लिमांनाही मशीदीसाठी २.७७ एकर जागा दिली जायला हवी होती. त्यांना ५ एकर जमीन का? असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. आता त्याचे काय पडसाद उमटतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Similar News