राष्ट्रकुल स्पर्धेत पी.व्ही. सिंधू करणार भारतीय चमूचं नेतृत्व
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाची (CWG 2022 )सुरुवात गुरुवारी होणार आहे.;
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाची (CWG 2022 )सुरुवात गुरुवारी होणार आहे.यामध्ये ७२ देशांतील ५ हजारांहून अधिक खेळाडू २० वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांसाठी भिडणार आहेत. भारत १८ व्यांदा या खेळांमध्ये उतरणार आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे.तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022 )ची ध्वजवाहक म्हणून भारताने PV सिंधूचे नाव दिले आहे.
दरम्यान भारताचा स्टार नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०२२ मध्ये खेळू शकणार नाही. मंगळवारी ही माहिती समोर आली आहे.त्यामुळे भारताची आशा आता पी .व्ही . सिंधू तसेच इतर खेळाडूंकडे लागली आहे. सिंधूने आतापर्यंत या खेळांमधील महिला एकेरीत प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. तर मिश्र सांघिक स्पर्धेत सिंधूने २०१८ च्या गेम्समध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तिसरे स्थान पटकावले होते. भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती. यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश होता.नीरज चोप्रा व्यतिरिक्त राष्ट्रकुलमध्ये सहभागी होणार्या भारतीय तुकडीत स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंमध्ये काही खेळाडू असेही आहेत, ज्यांचे सुवर्णपदक जिंकणे हे जळपास निश्चित मानले जात आहे.
चीन आणि जपानमधील खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत नाहीत, त्यामुळे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचा मार्ग सोपा झाला आहे.
Breaking news: India names PV Sindhu as CWG 2022's flagbearer after Neeraj Chopra's ousterhttps://t.co/zkF5ISQtef@Pvsindhu1 @Neeraj_chopra1 #CWG2022 pic.twitter.com/LdI77Aqubt
— Sports Tak (@sports_tak) July 27, 2022