भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज होणार आहे. हा सामना वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो (पोर्ट ऑफ स्पेन) येथील ब्रायन लारा अकादमी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल.
मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला.
भारतीय संघाला 17 वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावण्याचा धोका आहे. एवढेच नाही तर टीम इंडिया हरली तर सलग 13 मालिका जिंकून मालिका गमावेल.
या सामन्याकडे संपूर्ण देशातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलं आहे . सायंकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सामन्यात जिंकून भारत आपली जिंकण्याची परंपरा कायम ठेवेल? की वेस्टइंडीज ही परंपरा मोडण्यात यशस्वी होईल? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...