मानसी जोशी हे नाव तुम्हा सर्वांना परिचित असेलच. परिचित असण्याचे कारण या नावाने भारताची मान अनेकवेळा अभिमानाने उंचावली आहे. जगातील टॉप १० SL-३ श्रेणीतील पॅरा बॅडमिंटन खेळाडूंची लिस्ट जर आपण पाहिली तर या लिस्टमध्ये मानसी जोशी हे नाव दिसेलच दिसेल. अगदी वयाच्या सहाव्या वर्षापासून तीन आपलं बॅडमिंटन या खेळातलं करिअरला सुरुवात केली. मुळची अहमदाबाद, गुजरात येथील असलेल्या मानसीने आजपर्यंत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. पण हे सगळं सहज शक्य झालं का? तर नाही त्या पाठीमागे आहे त्यांचे अपार कष्ट, कष्ट आणि कष्ट..
आता उद्यापासून सुरू होणाऱ्या फोर्थ नेशन पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल (4 Nations Para Badminton International ) स्पर्धेसाठी मानसी सज्ज झाली आहे.. एखादे ध्येय गाठायचं म्हटलं की त्यासाठी जिद्द आणि कष्ट आलेच हेच जिद्द आणि मेहनत काय असते हे मानसीन आज केलेल्या एका ट्विट वरून समजून येतं. तिने या स्पर्धेसाठी चात्यांकडून शुभेच्छा मागितल्या आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट बोलकी आहे ती म्हणजे मानसीने शेअर केलेला फोटो. काय आहे हा फोटो? तर तिनं जिम मधील तिचा व्यायाम झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात योगा मॅट दिसत आहे आणि व्यायाम करून आपण या सामन्यासाठी सज्ज झालो असल्याचं तिने ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बस हा फोटोच त्यांच्या यशाचं कारण उलगडणारा आहे. बाकी हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...
Finished my gym session in the morning and I’m all geared up for 4 Nations Para Badminton International which begins from tomorrow here in Sheffield, England.
— Manasi Nayana Joshi (@joshimanasi11) August 1, 2023
Wish me luck 🍀 pic.twitter.com/9EbDZHOUvQ