IND vs SA, U-19 Women's T20 World Cup Final : भारतीय मुलींनी जिंकला T20 विश्वचषक !
IND vs SA, U-19 महिला T20 विश्वचषक अंतिम फेरी: सलामीवीर गोंगाडी त्रिशाच्या 44 धावांच्या जोरावर रविवारी क्वालालंपूर येथे झालेल्या महिला U19 T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेच्या केवळ 83 धावांचा पाठलाग करताना, भारताला फारशी अडचण आली नाही. कारण भारतानं फक्त एक विकेट आणि केवळ 11.2 षटकात आफ्रिकेचं आव्हान पूर्ण केलं. तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १०० धावाही करता आल्या नाही. त्यामुळं भारताने रविवारी क्वालालंपूर येथे महिला U19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 20 षटकांत 82 धावांत गुंडाळलं.
भारताने सलग दुसऱ्यांदा U19 महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलंय...