मूकबधिर ज्युदो खेळाडू वैष्णवीची ब्राझीलमध्ये होणाऱ्या डेफ ऑलिम्पिकसाठी निवड!
मुकबधीर असलेली ज्युदो खेळाडू वैष्णवी मोरेची ब्राझील येथे होणाऱ्या डेफ ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यभरातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.
धुळ्याच्या वैष्णवी मोरे या मूकबधिर असणाऱ्या विद्यार्थिनीची डेफलिंपिक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यातून या स्पर्धेसाठी फक्त 2 मुलींची निवड झाली असून धुळ्यातील वैष्णवी त्यापैकी एक आहे.
ब्राझील येथे होणाऱ्या २४ व्या डेफलिंपिक स्पर्धेत वैष्णवी बाळा मोरे हिची ज्युदोसाठी भारतीय संधात निवड झाली आहे. दिल्ली येथे झालेल्या निवडचाचणीत 70 किलो वजनगटात वैष्णवी ने सुवर्ण पदक जिंकून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. वैष्णवी मोरे ही सहयाद्री जुडो अकादमी व सोलारिस येथे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या रचना धोपेश्वर यांच्याकडुन जुडो चे प्रशिक्षण घेत आहे. रचना धोपेश्वर ब्लाइंड आणि डेफ मुलांना गेली अनेक वर्षे विना मोबदला ज्युदो चे प्रशिक्षण देत आहेत. तिला सोलारिस क्लब चे संस्थापक जयंत पवार, सहयाद्री संकुल चे विजय बराटे यांचे सहकार्य लाभले आहे.