Tokyo Paralympics: भारताला मिळालं पहिलं सुवर्ण पदक; अवनी लाखेराची ऐतिहासिक कामगीरी

Update: 2021-08-30 04:45 GMT

टोकियो पॅरालिंपिक ( Tokyo Paralympics ) 2020 मध्ये भारताची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारताने या स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. रविवारच्या घवघवीत यशानंतर सोमवारी अवनी लेखरा ( avani lakhera ) हिच्या रूपाने शूटिंग मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे.

सोमवारी (30 ऑगस्ट) ची पहाट भारतासाठी सुवर्ण पहाट ठरली. भारताच्या अवनी लेखरा हिने 10m AR Standing SH1 प्रकाराच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला. 19 वर्षांची अवनी पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. अंतिम फेरीत 249.6 गुण मिळवत अवनीने नवा पॅरालिंपिक विक्रम तर केला पण विश्व विक्रमाची बरोबरी देखील केली आणि भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे.

भारताच्या खात्यात एकूण 5 पदके

यासोबतच भारताच्या खात्यात आता एकूण 5 पदकं झाली आहेत. रविवारी भाविना, निषाद आणी विनोद यांच्या रुपात अनुक्रमे रौप्य, रौप्य, कांस्य अशा तीन पदकांची कमाई केली होती. तर सोमवारी पहाटे अवनी सुवर्ण तर योगेश ने रौप्य अशा दोन पदकांची कमाई केल्यामुळे भारताच्या खात्यात एकूण पाच पदके झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक क्रीडा प्रकारात भारताला आणखी पदकांच्या अपेक्षा आहेत.

Tags:    

Similar News