अहो.. गोगावले तुम्ही महिलांवर अविश्वास दाखवता त्या देशाच्या राष्ट्रपती देखील आहे
शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महिला व पुरुष यांमध्ये फरक आहे की नाही असं वक्तव्य केलं. यावरुन आता राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांचा महिला आमदारावर अविश्वास का आहे? महिलांना कमी का लेखत आहे. असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थीत झाले आहेत. देश चालवणाऱ्या राष्ट्रपती या महिला आहेत. जरी शिंदे-भाजप सरकार मध्ये महिलांना स्थान दिले नसले तरी देशातील अनेक संविधानी पदावर महिला काम करत पंतप्रधान व राष्ट्रपती सारख्या पद महिलांनी भूषवली आहेत. शिंदे- भाजप सरकारने विसरुन चालणार नाही
रायगड पालकमंत्री पदासाठी आ. भरत गोगावले हे आग्रेसर आहेत परंतु शिंदे- फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीची एंट्री झाल्याने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आमदार आदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद हे आदिती तटकरेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु पुढील मंत्रिपद विस्ताराला वेळ लागत आहे. त्यामुळे आम. गोगावले यांना अजून मंत्रीपदही मिळाले नाही.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत यावरुन आ. गोगवले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी भरत गोगावले म्हणालेत की, आम्ही वाईट करणार आहोत का? आम्ही त्यापेक्षा अधिक चांगले करु, कारण महिला आणि पुरूष यांच्यामध्ये थोडासा फरक येतो. गेले १५ वर्ष मला आमदारकीचा अनुभव आहे. आमच्या सहा आमदारांची एकच मागणी असल्याचं भरत गोगले यांनी सांगितले आहे