महिला धोरणाबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांची राज्यातील विभागीय आयुक्तांसह बैठक संपन्न!

Update: 2022-02-01 14:05 GMT

 राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत महिला धोरणाच्या प्रारूप मसूद्यावर आणि महिला व बाल सशक्तीकरणाच्या निधीबाबत चर्चा झाली. सुधारीत सर्वसमावेशक महिला धोरणाच्या मसुद्याबाबत तात्काळ अभिप्राय पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा व महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत 3 टक्के निधी याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्तांची बैठक झाली. ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे सर्व विभागीय आयुक्त बैठकीस उपस्थित होते.


या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन,सहसचिव श.ल.अहिरे, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे,उपसचिव विलास ठाकूर उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी या धोरणाचा प्रारूप मसूदा सर्व विभागीय आयुक्तांना पाठविला असून आयुक्तांनी अभिप्राय व सूचना तात्काळ पाठवाव्यात. सर्वसमावेशक महिला धोरण तयार करावयाचे असल्यामुळे यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याबाबतचा शासन निर्णय अंमलात आणला आहे. त्यानुसार सर्व विभागांनी आपल्या विभागातील जिल्ह्यात कार्यवाही करावी. महिला व बाल सशक्तीकरण योजनेत एकूण 21 नवीन योजना राबविण्यात येणार आहेत.


महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना जिल्हाधिकारी यांनी प्राधान्याने जमीन उपलब्ध करून द्यावी. राज्यात प्रायोगिक तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या अमरावती पॅटर्नप्रमाणेच महिला व बाल विकास भवनाचे बांधकाम करण्यात यावे, असेही मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बैठकीत सांगितले.

Tags:    

Similar News