मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर करुणा मुंडे यांचे खळबळजनक वक्तव्य..
माझ्यावरती फार मोठा दबाव आहे. मला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचं करून मुंडे यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर त्यांच्यावर आत्महत्या करण्यासाठी कोण दबाव आणत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे...;
काल करुणा मुंडे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ही सदिच्छा भेट आल्याचं त्यांनी म्हंटल असून हे सरकार बदलून मुख्यमंत्र्यांनी माझं स्वप्न पूर्ण केले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मला न्यायाची पूर्ण खात्री आल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. करुणा मुंडे यांनी वारंवार धनंजय मुंडे माझे पती असून त्यांनी माझी फसवणूक केलं असल्याचं म्हंटल आहे. याच संदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे हे प्रकरण मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हे माझे पती असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी माझ्यावरती फार मोठा दबाव आहे. मला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. ज्या काही माझ्या समस्या आहेत त्या समस्या मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला असल्याचा सुद्धा त्या म्हणाल्या...