बाळासाहेबांना अटक केली असती का भाजपचा सवाल आणि त्यावर शिवसैनिकांची भन्नाट उत्तर
राणा दांपत्याला अटक झाल्यानंतर भाजपने बाळ ठाकरेंचं एक व्यंगचित्र टाकून बाळासाहेबांना अटक केली असतीत का हा प्रश्न विचारला आणि त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट उत्तरं दिली आहेत.
युती तुटल्यापासून पासून शिवसेना आणि भाजप हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला याचा प्रत्यय देखील आला आहे नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्य विरोधात शिवसेना ज्या पद्धतीने लढली जो संघर्ष झाला त्यानंतर या दांपत्याला राजद्रोहाच्या सलमान अंतर्गत अटक देखील करण्यात आली मात्र भाजपनं यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे भाजप महाराष्ट्र या आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजपनं सत्ताधाऱ्यांना किंबहुना शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अटक केली असती का असा थेट सवाल विचारला आहे भाजप ने विचारलेल्या प्रश्नावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.
यावर एम. एच. या वापरकर्त्याने भाजपला थेट रावणाच्या अवलादीची उपणा दिली आहे. ते म्हणतायत, "भाजप रावण ची अवलाद आहे? धर्माला बदनाम करून ठेवले ? भगवान राम यांना बदनाम करून ठेवले आता हनुमान यांना बदनाम करू राहिले ? तुमचं राजकारण करायचं स्वतःच्या नावावर करावा धर्माच्या नावावर कशाला करतात धर्माला कशाला बदनाम करतात ? लोकांना दाखवून कोणती महाआरती होती", आणि त्यांनी धर्माला कशाला बदनाम करताय असा सवालच विचारला.
नितेश गौरव या वापरकर्त्याने तर बाळासाहेब तुमच्यासारखे पेपरावरचे हिंदूत्व नव्हते. असा टोलाच लगावला आहे. "बाळासाहेब बाळासाहेब होते तुमच्या सारखे पेपरावरचे हिंदुत्व न्हवते.. जाळणारी लोक आहात तुम्ही.. सत्ता नाही म्हणून पागल झाले आहे तुमचे सर्व नेते.. त्यांना काही सुचतच नाही. आणी तुमच्या सारख्या आय.टी वाल्यांना शिवसेनेशिवाय काही उरले नाही.."