कंगनाला न्यायालयाचा मोठा झटका, अनधीकृत बांधकामाला परवानगी नाहीच

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतला दिंडोशी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कंगनाने खार इथल्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयाने नधिकृत असल्याचं सांगितलं आहे. या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने कंगनाला 6 आठवड्याची वेळ दिली आहे. त्यांनतर पालिका कंनानाने केलेलेल्या अनधिकृत बांधकामा बुलडोझर लावून कारवाई करू शकते.

Update: 2020-12-24 04:30 GMT

खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगनाने एकाच माळ्यावरील 3 फ्लॅट एकत्र केलेले आहेत. या बांधकामात तिने मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा खटला दिंडोशी न्यायालयात सुरु होता. न्यायालयाने या खटल्यामध्ये कंगनाने केलेले वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याचा निकाल दिला आहे.तसेच, कंगनाला या निर्णयाला आव्हान देण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. सहा आठवड्यांच्या आत कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही, तर कंगनने केलेल्या अनधिकृत बांधकामाला पाडण्यास न्यायालयाने मुभा दिलेली आहे. कंगनाने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तिला 2018 साली नोटीस देण्यात आली होती.

कंगनाने खार येथील घरात नेमकं काय केलं?

कंगनाचा खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत एक फ्लॅट आहे. या इमारतीतील एकाच माळ्यावरील तीन फ्लॅटला तिने मर्ज करुन मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जास्तीची जागा अतिक्रमित केली. कंगनाने तिच्या घरात लॉबी, पॅसेज आणि कॉमन जागा एकमेकांत मर्ज केलेले आहेत. या एकत्रिकरणाचा उल्लेख या मंजूर आराखड्यात नाही. याबाबत पालिकेने कंगनाला 2018 मध्ये नोटीस पाठवली होती. हेच बांधकात अनधिकृत असल्याचं आता न्यायालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, कंगनाने उच्च न्यायालयात अपिल केले नाही, तर तिने केलेल्या बांधकामावर होतोडा पडू शकतो.

Tags:    

Similar News