ही पोस्ट मी मराठीतून सुद्धा लिहू इच्छिते. कारण हा आपल्या मराठी माणसाचा खास ठेवा आहे. विशाखा सुभेदार या प्रचंड ताकदीच्या अभिनेत्रींना थँक्स म्हणण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी मी हे लिहीत आहे.
गेल्या आठवड्यात मी दिल्लीत होते. तिथल्या प्रचंड थंडीची सवय नसल्याने किंवा थंडी बाधल्याने माझ्या पाठीत उसण भरली. इतकी की माझ्याने हालणे, फिरणे, झोपणे किंवा श्वास घेणे काहीच शक्य होत नव्हते.मला थेट हॉस्पिटल गाठायला लागले. अनेक उपचार करून सुद्धा दुखण्याचे निदान काही होत नव्हते आणि हॉस्पिटल बेडवर विव्हळत पडावे लागले.
तिथे पडल्या पडल्या मी विशाखा ताईंचे हस्यजत्राचे episodes पाहिले. हसू काही थांबेना. हळू हळू थोडे थोडे हसत हसत मग चांगले जोरदार हसायला लागले. लोळत, अगदी पोट धरून! आणि हसता हसता चक्क बरी झाले.
ही फक्त विशाखा सुभेदार यांच्या अभिनयाची ताकद आहे. मला त्यांचे कौतुक करायला आणि आभार मानायला शब्द कमी पडतायत. त्याची कॉमेडी बघताना भाषा कळत नव्हती तरी दिल्लीचे हॉस्पिटल सुद्धा हास्याने दुमदुमत होते. विशाखा या सध्याच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आहेत.
त्यांच्या स्वभावाचा एक सुंदर पैलू जेव्हा त्या सखीच्या युनिटच्या उद्घाटनासाठी डहाणू ला आल्या होत्या त्यावेळेस पाहायला मिळाला होता. मोकळेपणा आणि मदत करायची वृत्ती ह्या दोन्ही गोष्टी प्रकर्षाने दिसून आल्या. देव त्यांच्यावर सतत कृपा करीत राहो.यशस्वी तर त्या आहेतच पण आणखी नवी उत्तुंग शिखरे सर करोत ही सदिच्छा.
विशाखा माझ्यासारख्या हसायला आवडणाऱ्या माणसांच्या हृदयात तर तुम्ही विराजमान आहातच.
आणि हो, मित्र मैत्रिणींनो, कधी दुःखात असाल, आजारी असाल तर विशाखाची कॉमेडी पहा. अक्सीर इलाज आहे.
And yes, if you are feeling low or are in pain, the best remedy is to watch Vishakha's comedy....
-स्वाती बेडेकर