अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्वीटर हॅंडलवर चाहत्यांना कोरोनामुक्त राहण्यासाठी संदेश दिलाय. या ट्वीटमध्ये रितेशच्या फोटोवर मास्क लावला असून त्याने “आपला मास्क भारी, धुतलेला हात भारी...च्या मायला आपलं सगळंच लय भारी” असं म्हटल्याचं दाखवलं आहे.
रितेशनेही आपला हा ‘लय भारी’ फोटो शेअर केलाय. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क आणि हात स्वच्छ धुण्याचा संदेश दिला आहे.
#corona - wear your masks - wash your hands- stay safe & be responsible pic.twitter.com/SqKXMieE1T
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 15, 2020