काय आहे अॅनिमिया ?
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतर अनेक पोषक तत्वांसोबत लोहाचीही गरज असते. लोह शरीरात लाल रक्तपेशी बनवते. या पेशी शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्याचे काम करतात. हिमोग्लोबिन फुफ्फुसातून रक्तात ऑक्सिजन वाहून नेतो. पण जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते, तेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑक्सिजनचीही कमतरता जाणवू लागते. ज्यामुळे व्यक्तीला अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो, या स्थितीला ॲनिमिया म्हणतात.
ही आहेत लक्षणेः
- बराच काळापासून असणारा थकवा
- त्वचा पिवळी पडणे
- ऊर्जेचा अभाव
- धाप लागणे
- हृदयाचे ठोके जलद होणे
- मूडी असणे
- भूक न लागणे किंवा सतत नैराश्य जाणवणे
महिलांना ॲनिमिया होण्याची कारणेः
- गर्भावस्थाः आयर्न सप्लिमेंट्सच्या अनुपस्थितीत, अनेक गर्भवती महिलांना लोहाच्या कमतरतेचा ॲनिमिया होतो. याचे कारण असे की त्यांचे लोह हे त्यांच्या वाढत्या रक्ताबरोबरच वाढत्या बाळासाठी हिमोग्लोबिनचे स्रोत असावे लागते. अशा परिस्थितीत ॲनिमियाचा धोका वाढतो.
मासिक पाळीः मासिक पाळी दरम्यान महिलांचा खूप ब्लड लॉस होते. त्यामुळे बहुतांश महिला ॲनिमियाच्या बळी ठरतात. याशिवाय पेप्टिक अल्सर (peptic ulcer), कोलन पॉलीप (colon polyp) किंवा कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) मुळेही ॲनिमिया होतो.
- व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरताः शरीरात व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण कमी असले तरी ॲनिमियासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन देखील कमी होते. त्यामुळे हिमोग्लोबिनही कमी होऊ लागते आणि महिलांना ॲनिमिया होण्याची भीती राहते.
- ब्रेस्ट फीडिंगः ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देतात त्यांना देखील ॲनिमिया होण्याचा धोका असतो.
- आहाराच लोहाची कमतरताः जर एखाद्या महिलेने तिच्या रोजच्या आहारात खूप कमी लोह घेतले तर तिच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते. हे टाळण्यासाठी मांस, पोर्क, सीफूड, पालक सारख्या हिरव्या भाज्या, ड्रायफ्रुट्स इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करा.
अॅनिमिया होण्यापासून वाचण्यासाठीचे उपाय :
- शरीरातील लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहारात गाजर, टोमॅटो आणि पालेभाज्या यांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
- घरी स्वयंपाक करताना नेहमी लोखंडाच्या भांड्यांचा वापर करावा. असे केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण चांगले वाढते.
- आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण आपल्या वजनाच्या प्रमाणात असावे लागते.
- आहारात व्हिटॅमिन सीचा वापर करा
- दही आणि हळदीचा असा करा वापर
- आहारात हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा
- भरपूर पाणी आणि फळांचे रस प्या
- तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या
- आहारात तीळाचा वापर करा
- काळ्या मनुका आणि खजूराचे सेवन करा
- शेवग्याची पाने आहारात घ्या
- अंजीर आणि केळी यांचं सेवन करा