बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटींचे आपल्या सौंदर्य कौशल्याने रूपडं पालटणारा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वाप्निल शिंदेने ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाप्निल हा अनेक बॉलीबुड मधील आघाडीच्या अनेक कलाकारांचे आऊटफिट्स आणि मेकओवर करणारा फॅशन डिझाईनर आहे.
स्वाप्निलनं केलेल्या या बदलाचे बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी स्वागत केले आहे. स्वाप्निलने त्याच्या ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय त्याच्या अधिकृत @Officialswapnilshinde या इंस्टाग्राम खात्यावरून जाहिर केला आहे. स्वाप्निलने त्याचा बदललेल्या लूक मधला एक फोटो आणि त्यासोबत एक भावनिक पोस्ट लिहीत मी ट्रान्सवूमन होत आहे असं लिहीलं आहे.
स्वाप्निल त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो 'तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो.' या कारणामुळे स्वप्नीलने स्वत:ची सर्जरी करुन घेतली आह. मला कॉलेजमध्ये वाटायचं की मी गे आहे. म्हणून मला पुरूषांचं आकर्षण आहे. मात्र वेळेसोबत मला कळलं की मी एक ट्रान्सवूमन आहे.
स्वाप्निल जसं त्याच्या डिझाईन कौशल्याने बॉलीवूड कलाकारांचे पूर्णपणे मेकओवर करतो, तसंच त्याने स्वतःचाही मेकओवर केला आहे. त्याचा साईशा हा लूक बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना खूप आवडला आहे. अनेकांनी त्याच्या या निर्णयाबद्दल त्याचं कौतूक केलं आहे, तर त्याच्या या नव्या लूकचं सनी लिओनी, अदिती राव हैदरी, श्रृती हसन, सई ताम्हणकर यांनी स्वप्नील अर्थात साईशाच्या पोस्टवर कॉमेंट करुन तिला पाठिंबा दर्शवला आहे.