थंडीत तुमचे पण शरीर आखडते का ? तसे होत असल्यास घ्या ही काळजी...

Update: 2024-11-30 12:14 GMT

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच हिवाळ्यात हात, पाय आखडून येतात. हे दुखणं कधी साधारण तर कधी फार त्रासदायक असत. या वेदनांचा अनेकदा त्या व्यक्तीच्या दिनचर्येवर परिणामदेखील होऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर सकाळी उठायला त्रास होणे, कंबरेत वाकायला न येणे, पायऱ्या चढ उतार करताना सांधे दुखणे. या दुखण्यामुळे केवळ शारीरिक अस्वस्थताच नाही तर मानसिक ताणही येऊ शकतो.


हे दुखणे अनेक कारणांनी होऊ शकते, मात्र योग्य आहार, उष्णतेची काळजी, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ल्याने या दुखण्यावर नियंत्रण ठेवता येते. परंतु अनेक कारणांमुळे हिवाळ्याच्या हंगामात हे दुखणे वाढते आणि विशेषत: जुनाट वेदना किंवा संधिवात असलेल्या लोकांना थंडीचा अधिक प्रमाणात त्रास होतो. पण काही सवयींच्यात बदल करून तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता.

व्हिटॅमिन B-12 ची कमतरता आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे अंग दुखीची समस्या भेडसावू शकते. शरीराला पुरेसे पोषक तत्व न मिळाल्याने देखील या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते.

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी हिवाळ्यामध्ये पोषक आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, सकाळच्या सूर्यप्रकाशात चालायला जाणे, थंडीत मिळणाऱ्या वेगवेगळ्या फळांचे आपल्या दैनंदिन आहारात समावेश करणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होऊ शकते.

Tags:    

Similar News