अल्लू अर्जुन म्हटला “कसं काय मुंबईकर ?” चाहत्यांशी साधला मराठीत संवाद…

Update: 2024-11-30 12:19 GMT

आर्या, वेदम, सत्यमूर्ती सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अत्यंत सुंदर भूमिका साकारलेला अल्लू अर्जुन टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अत्यंत फेमस आहे. पुष्पा चित्रपटापासून त्याचे चाहते संपूर्ण जगभर पसरले आहेत. आणि आता पुष्पा 2 चं वार सर्वत्र घुमत आहे. आणि हाच अल्लू अर्जुन सध्या संपूर्ण देशात पुष्पा 2 चित्रपटाचे प्रमोशन करत फिरत आहे.

Full View


नुकतचं त्या निमित्ताने तो मुंबईत आला असता त्याने मुंबईकरांशी मराठीत संवाद साधलाय. ‘पुष्पा २’च्या मुंबईतील प्रमोशनदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येतो तेव्हा निवेदक त्याचं स्वागत करतो आणि तुम्ही इथल्या लोकांशी काही तरी संवाद साधावा अशी विनंती करतो. अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो. उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. नमस्कार बोलून झाल्यानंतर काही वेळ थांबलेला अल्लू अर्जुन “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो. पुन्हा लोक टाळ्या वाजवतात. अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

Tags:    

Similar News