जान्हवी कपूरच्या टी-शर्टने वेधलं लक्ष!

Update: 2024-12-04 07:04 GMT

जान्हवी कपूर ही तिच्या अनोख्या शैलीसाठी ओळखली जाते. आणि बऱ्याच दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांचे नाते चर्चेत आहे.


जान्हवी कपूरने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने तिचा प्रियकर म्हणजे शिखर याच्या नावाचे टीशर्ट घातले असून, त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. आणि हा व्हायरल झालेला फोटो नाशिकमधील एका हॉटेलचा असून, जान्हवी कपूर एका सिनेमाच्या शूटिंगसाठी येथे आली होती. तिच्या बरोबर वरूण धवन देखील आहे. हे टीशर्ट जान्हवीने परिधान केल्याने चाहत्यांमध्ये देखील एकच खळबळ उडाली आहे.

हा फोटो हॉटेलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आमच्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण होता की, आम्हाला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार जान्हवी कपूर आणि वरूण धवन यांचा पाहुणचार करता आला. हा क्षण आमच्यासाठी ‘पिंच अस’ मूव्हमेंटसारखा होता.”

Tags:    

Similar News