अभिनेता विक्रांत मॅस्सीचा इंडस्ट्रीला बाय बाय? विक्रांतच्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का
चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना चकित करत अभिनेता विक्रांत मॅस्सीने अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. '12th Fail, 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'सेक्टर 36' मधील प्रशंसित कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, ३७ वर्षीय अभिनेत्याने सोमवारी सकाळी भावनिक इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली.
२०२५ मध्ये अभिनयातून संन्यास घेण्याचा विचार करत एक पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि विलक्षण आहेत. ज्यांनी मला कायम सपोर्ट केला त्या सर्वांचे मी आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे. त्यामुळे पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे. २०२५ मध्ये आपण शेवटचे एकदा भेटू. जोवर योग्य वेळ येत नाही. माझे २ सिनेमे आणि असंख्य आठवणी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार. कायम मी तुमचा ऋणी असेन. अशी पोस्ट करुन विक्रांतने ही घोषणा केलीय. २०२५ मध्ये विक्रांतचे 'यार जिगरी' आणि 'आँखो की गुस्ताखियाँ' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर विक्रांत बॉलिवूडमधून संन्यास घेईल. सध्या विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमा चांगलाच गाजतोय. पण सध्या विक्रांत मॅस्सीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाचा एक धक्का बसला आहे.