शेवटच्या श्वासापर्यंत रमा एकच सांगते...

ramabai ambedkar poem;

Update: 2023-02-07 09:06 GMT

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहलं पण त्यांना सुरुवातीपासून साथ देणारी रमाईने जिद्द दिली अनेक स्त्रियांना लढण्याची ,तीच जिद्द आणि तगमग मांडणारी प्रतीक्षा काटे यांची "रमाई " ही कविता नक्की वाचा ...

रमाई


अशी लेक समरथ आंबियाची आंबाराई

रानातून चाले रमा मागे वळूनिया पाहि

आंबियाची आमराई आंबे लागले पाडाला

मोठी झालीया रमा झोका बांधते झाडाला

निरागस हे रूप किती साध हे साजणं

रामजींची ची पडली नजर कसं गोड ते लाजणं

आला दिस हा सोन्याचा झाली वाघाची वाघिन..

दिलं वचन साहेबांनी नेहमी सुखात ठेवीन

(रमा तीच सुख दुख सांगताना म्हणते..)

गेले परदेशी साहेब, जंग लढावया मोठी

शिकुनिया मोठे व्हाव (कळलय मला) नव्हती स्वप्न त्यांची छोटी

"करी उद्धार समाजाचा स्वतः राहिले उपाशीपोटी

कळत होतं मला सर्व, मुद्दाम हसण्याची खोटी..

आला दिस आनंदाचा, यशवंत जन्मला

भरले घर लेकरांनी एकटे पणा दूर झाला

साहेब गेले परदेशी त्यांचा लढा सुरू झाला....

वाट पाहीन मी त्यांची, जिव कासाविस झाला..

घोर कलयुग झाला दिवा वंशाचा विझला

साहेब नाही आले बघायाला, दिली सजा ही मजला

पुन्हा राहिली उभा मी, माझा संसार काराया

बळ होत म्हणूनच दुःख लागली सराया

घर काम मी करीन,

शेण गौरया मी थापिन

माझ्या साहेबाच्या सौंसाराचं

बीज सुखान पेरिन

कशी लागली नजर माझ्या सौंसाराला

घेत होता तो परिक्षा

नेलं माझ्या या पिल्लांना

मला नागला आजार

दिली कसली सजार..

(रमा एकच मागणं मागते)

साहेब परदेशी होतं

त्यांना शिक्षणाची गोडी

माझ्या साहेबांसाठी जगायचंय

देवा देना मुभा थोडी..

( शेवटच्या श्वासापर्यंत रमा एकच सांगते..)

अख्ख आयुष्य साहेबांसाठी अर्पन केल मी

ती सांगते.. अन मला ठाऊक हाय..

शिकुन मोठ होऊदे , नाव जगात गाजूदे माझ्या भिमाची पुण्यायी थाट-माटात साजुदे

भाग्य मिळाल मला झाली सुबेदाराची मी सुन

काय बोलु मि कळना माझं हरपल भान

इतिहास घडवतील साहेब दावतील लय मोठे काम करून

यश पनाला येईल, माझ्या भिमाच्या कष्टातून.. माझ्या भिमाच्या कष्टातून..

Tags:    

Similar News