शुक्रवारी दिल्ली येथे 9 वे वार्षिक शक्ति अनंतरराष्ट्रीय महिला उद्योजिकता शिखर संमेलन भरले होते. या संमेलनाला केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी संबोधित केल. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महिला विषयक योजनांचा आढावा घेत महिलांना मार्गदर्शन केले. नारायण राणे यांनी त्यांच्या X हॅंडल वरून पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की "आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या च्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली, देशाच्या 'महिला शक्ती'ने गेल्या 10 वर्षांत अभूतपूर्व वाढ केली आहे. महिला उद्योजकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. महिलांनी विविध क्षेत्रात यशस्वी उद्योग उभे केले आहेत, तसेच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनात वाढ देखील झाली आहे. देशाच्या विकासात महिलांचे योगदान वाढले आहे".
"आजचे विश्वकर्मा, उद्याचे यशस्वी उद्योजक बनण्याचा आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी 'पीएम विश्वकर्मा' योजनेंतर्गत 18 प्रकारच्या विश्वकर्मा बंधू-भगिनींना मदत केली जात आहे." असे नारायण राणे यांनी नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे:
सरकारी योजनांचा महिला उद्योजकांना हातभार
मुद्रा योजना: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध करून देते.
स्टार्टअप इंडिया: नवीन आणि इनोवेटिव्ह उद्योगांना प्रोत्साहन देऊन महिला उद्योजकांना मार्गदर्शन आणि संसाधने पुरवते.
स्टैंड-अप इंडिया: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांना उद्योजक बनण्यासाठी आर्थिक आणि व्यावसायिक मदत करते.
पीएम महिला सशक्तिकरण योजना: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयं- मदत गटांना आर्थिक आणि संस्थात्मक पाठबळ प्रदान करते.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाटत "भारत विकसित देश बनावा, प्रत्येक भारतीय नागरिकाला जे 146 कोटी भारतीय आहेत, त्याच्यात तुम्ही महिला 47% टक्के आहात. महिलांची संख्या बघितली मागील काळात कमी होती, पण आज 47 % टक्के महिला आहेत, तर पुरुष 53% टक्के आहेत. अंतर खूप कमी होत चाललं आहे. पण ही अंतर वाढण्याची स्पर्धा नसून, महिलांच्या प्रगतीची स्पर्धा झाली पाहिजे. महिलांच उत्पादन, महिलांचे उद्योग एकही क्षेत्र असं नसलं पाहिजे जिथे महिला नाहीयेत." असं 9 वे वार्षिक शक्ति अनंतरराष्ट्रीय महिला उद्योजिकता शिखर संमेलनात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेम्हटले आहे.
महिला उद्योजकता ही भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मोदी सरकारने महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणात वाढ होत आहे आणि देशाच्या विकासात महिलांचे योगदान वाढत आहे. असं देखील मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.