दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने देशात पहिला व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट 'जिओ ड्राइव्ह VR' लॉन्च केला आहे. कंपनीने हा VR हेडसेट खासकरून IPL पाहणाऱ्यांसाठी सादर केला आहे.
यामध्ये 100 इंच व्हर्च्युअल स्क्रीनवर 360 डिग्री व्ह्यू उपलब्ध असेल, वापरकर्ते VR हेडसेटद्वारे IPL व्यतिरिक्त इतर कोणतेही व्हिडिओ पाहू शकतात.
Jio Drive VR ची किंमत काय असेल?
Jio Drive VR हेडसेट कंपनीने 1299 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे. खरेदीदार हे हेडसेट JioMart वरून खरेदी करू शकतात. पेटीएम वॉलेटवरून पेमेंट केल्यास कंपनी 100 रुपयांची सूट देत आहे.
Jio Drive VR
Jio Drive VR हेडसेट 4.7-इंच, 5.7-इंच आणि 6.7-इंच डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करता येत. Android डिव्हाइसेस 'Android 9' किंवा त्याहून अधिक क्षमतेचे हवे तर Apple डिव्हाइसेस iOS 15 किंवा त्याच्यावर चालत असले पाहिजेत. Jio Drive VR मध्ये परफेक्ट फिट होण्यासाठी 3-वे अॅडजस्टेबल स्ट्रॅप आहे. यासोबतच ऑप्टिकल आरामासाठी अॅडजस्टेबल लेन्सही उपलब्ध आहेत.