स्त्रीची / मुलींची व्यसनाधीनता

पुण्यातील वेताळ टेकडीवरील ड्रग्ज, दारूच्या नशेतील दोन मुलींचा व्हीडीओ व्हायरल झाल्या बरोबर लेखिका आणि अभिनेत्री सोनल गोडबोले यांनी लिहिलेला हा लेख नक्की वाचा.

Update: 2024-02-27 06:09 GMT

कालपुण्यातील वेताळ टेकडीवरील ड्रग्ज , दारूच्या नशेतील दोन मुलींचा व्हीडीओ पाहिलापुण्यातील वेताळ टेकडीवरील ड्रग्ज , दारूच्या नशेतील दोन मुलींचा व्हीडीओ पाहिलापुण्यातील वेताळ टेकडीवरील ड्रग्ज , दारूच्या नशेतील दोन मुलींचा व्हीडीओ पाहिला आणि मन हेलावुन गेलं. हा व्हीडीओ जेव्हा त्यांचे पालक पहातील तेव्हा त्यांना काय वाटेल ? . हा प्रश्न मनात आला आणि त्याचक्षणी हाही विचार मनात आला कि या मुलींचे पालक जर स्मोक ड्रींक करत असतील तर ? तर त्यांना याचा पश्चाताप होइल का ?..

परवा सीसीडीत बसले होते तिथेही स्त्रीया सलग स्मोक करत होत्या. आणि त्यांच्या शेजारी बसलेले पुरूष फक्त गप्पा मारत होते. त्यांची वजने पाहुन वाटलं, जर या इथे ४ तास बसुन स्मोक, ड्रिंक करु शकतात तर या महिला या वेळात व्यायाम का करत नाहीत ?.. व्यायामासाठी वेळ नाही आणि पार्टी, व्यसनं यांना यांच्याकडे वेळ कसा असतो ??.. फुकट मिळालेल्या शरीराकडे या इतक्या सहजतेने कशा काय पाहु शकतात ?, अशी दृश्य पाहिली की त्रास होतो.. पुस्तक प्रकाशन सारख्या चांगल्या समारंभाला १०० माणसे आणि गेटटुगेदर , पार्टी , धांगडधींगा यांना हजार माणसे , पुस्तक वाचुन परत करतो असा म्हणणारा माणूस गेटटुगेदर ला १००० रुपये सहज काढुन देतो .. भगवद्गीता क्लास फुकट आहे तिथे लोकांना यायचे नाही पण तिकीट काढुन मुव्हीला जायचे आहे किवा मुव्ही संपल्यावर होटेलींग करायचे असते..

कलियुगात माणसे अशी का वागतात? तर नसावीत बहुधा कारण युग कुठले आहे, यापेक्षा आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं याकडे दुर्लक्ष केले जाते. वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या नादाला लागुन या मुली / स्त्रीया स्वतःला पुरुषांच्या पुढे ढकलत आहेत याची खरच गरज आहे का ?? आई पार्टी करते मग मुलीने काय करायला हवे ?? आई सतत घराबाहेर हिंडत असेल तर मुलगी तेच पहात असते. घर , संसार , जबाबदारी , उत्तम विचार , उत्तम आहार , व्यायाम , कुटुंब याकडे पाठ फिरवुन आपण खरच महिला दिन साजरा करणार आहोत का आणि केला तर त्यातुन काय साध्य होणार आहे याचा विचार महिलानी करावा. या नशेत असलेल्या मुलींचा व्हीडीओ सगळीकडे व्हायरल झाला, इथुन पुढे त्यांच्या आयुष्याचे काय ?? त्यांच्या लग्नाचे काय ?? नशेतुन बाहेर आल्यावर त्यांच्या मानसिकतेचे काय ?व्यसनामुळे लैगिकतेवर परिणाम होतो. मुलं व्हायला अनेक अडचणी येतात परिणामी क्षणीक आनंदासाठी संपूर्ण कुटुंब होरपळुन जातं.

संध्याकाळी काय करु हा प्रश्न पडुच कसा शकतो ? भरपुर वाचन करा, व्यायाम करा, चांगले मित्र जोडा, चांगल्या गोष्टी पहा / ऐका, वेगवेगळे पदार्थ करा, आहारात आणि विचारात न्युट्रीशन व्हॅल्यु वाढवा, ज्यांना मनापासून व्यसनाना दुर ठेवायचे आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा..

८ मार्च महिला दिन तोंडावर असताना लज्जास्पद गोष्टी समोर येत आहेत आणि आपण आदरासाठी भांडतो पण आपण जबाबदारीने वागतो का ??.. याचा विचार प्रत्येक स्त्रीने करावा.. आपला नवरा , आपली मुलं , सासु सासरे ,आईवडील यांच्याकडे दुर्लक्ष करत किवा त्यांना बाहेरून ऑर्डर करा असं सांगुन आपण खुशाल पार्ट्या करत हिंडत बसायचं यात कसलं आलय स्त्रीत्व ??

प्लीज यावर विचार करा.. आपल्यामुळे पुढची पिढी बिघडली हा रोश ओढवुन घेण्यापेक्षा माझ्यामुळे एक सक्षम पिढी तयार झाली याचा आनंद घ्या.. संगत बदला.. गॉसीपींगवर मौल्यवान वेळ वाया घालवु नका.. मनाने ,शरीराने असलेली सुंदर स्त्री ही कायमच सुंदर पिढीचा आणि समाजाचा वड असणार आहे ज्याच्या पारंब्या या जमीनीला कायम धरुन असतील.. गाड्या , दागिने , यात न रमता उच्च लेव्हलच्या विचारसरणीने आपले व्यक्तीमत्व घडवा . आपल्याला पाहुन समाज आणि कुटुंब घडत असतं..

अध्यात्माची जोड आयुष्याला द्या त्यामुळे आपण एका वेगळ्या लेव्हलवर कायमच रहातो. महिला दिनाची वाट पाहु नका तर रोजच कुटुंबाकडुन आणि समाजाकडुन सन्मान मिळवा..आणि रोजच महिला दिन साजरा करा.. दिन की दीन हे तुम्हीच ठरवा..

सोनल गोडबोले

लेखिका आणि अभनेत्री

8605697161

Tags:    

Similar News