Instagram चे वापरकर्त्यांना नवीन भन्नाट फिचर..

Update: 2023-04-22 02:10 GMT

इंस्टाग्राम वापरकर्ते आता त्यांच्या बायोमध्ये 5 लिंक जोडू शकतात. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी त्यांच्या इन्स्टाग्राम चॅनल अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. यापूर्वी, वापरकर्ते त्यांच्या बायोमध्ये फक्त एक लिंक जोडू शकत होते.

मात्र, या फीचरशिवाय अनेक लोक थर्ड पार्टी सर्व्हिस 'लिंकट्री'द्वारे बायोमध्ये एकापेक्षा जास्त लिंक जोडतात. Linktree आपल्या वापरकर्त्यांना एकाधिक URL (लिंक) सह webpage तयार करण्याचा पर्याय देते. यानंतर यूजर्स त्या वेबपेजची लिंक इंस्टाग्रामच्या बायोमध्ये जोडतात.

सर्व 5 लिंक्स फक्त Instagram मध्ये दिसतील..

लिंकट्रीच्या माध्यमातून बायोमध्ये जोडलेल्या सर्व लिंक्स इन्स्टाग्राममध्ये दिसत नाहीत, मात्र या फीचरनंतर आता सर्व ५ लिंक्स इन्स्टाग्राममध्ये दिसतील. जर कोणी तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइलला भेट दिली तर त्यांना सर्व लिंक दिसणार नाहीत. प्रोफाइल पाहणाऱ्याला लिंकसह 'इतर' चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून, तुम्ही जोडलेल्या सर्व लिंक्स दिसतील.

इंस्टाग्रामने क्रॉस-प्लॅटफॉर्म शेअरिंग सेवा देखील सक्षम केली आहे..

Instagram ने अलीकडे क्रॉस-प्लॅटफॉर्म शेअरिंग सेवा देखील सक्षम केली आहे. यानंतर, आता इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे रील आणि पोस्ट थेट व्हॉट्सअॅप, मेसेंजरसह इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतात.

Tags:    

Similar News