फेअर अँड लव्हलीमधून ‘फेअर’शब्द काढण्याचा निर्णय निश्चित स्वागतार्ह पाऊल आहे पण यासाठी "social acceptance" किती आहे? समाज ही बाब "fairly" घेणार आहे का? पुन्हा "fair" शब्द
भारतीय समाजात म्हणा किंवा अन्य कोणत्याही समाजात "गोरा" रंग प्रतिष्ठेच sign आहे. लग्नाच्या बाजारात तर "गोऱ्या " रंगाला जरा जास्तच मागणी आहे. तू गोरी नसशील तर तुला चांगलं स्थळ नाही मिळणार, लवकर लग्न कर नाहीतर तुझ चेहरा प्रौढ वाटेल नंतर प्रोब्लेम होईल या गोष्टी सर्रास ऐकल्या जातात. Cosmetic जाहिरातीमध्ये गोरी असशील तर तुझा आत्मविश्वास वाढेल, नोकरी मिळेल (बुध्दीमत्ता???), तुला मुलगा पसंत करेल हे सर्रास बिंबवले जाते. इतकंच काय ज्या सरकारी जाहिराती असतात त्यात "गरीब" लाभार्थी जाणूनबुजून "सावळ्या" रंगात दाखवल्या जातात..! तुम्ही "फेअर" हा शब्द काढत आहात पण वर्षानुवर्षे या समाजावर बिंबवलेल "गोरेपणा" कोण काढणार आहे?
टिप : मी सुद्धा पार्लरला जाते पण गोरं होण्यासाठी नाही
शायना हसीना, ( कर आणि प्रशासन अधिकारी)
(सदर फेसबुक पोस्ट शायना हसीना यांच्या वॉल वरुन घेतली आहे. फेसबुक साभार)