इंधन दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या खर्चात वाढ होणार आहे.
पेट्रोल डिझेलच्या नव्या दरामुळे वाहतूक खर्च सुमारे २० टक्के वाढला. मालाची विक्री करताना तो खर्च समाविष्ट केल्याशिवाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांजवळ कोणताही पर्याय उरला नाही. सध्या मुंबई-ठाण्यात टोमॅटोसह अनेक भाज्यांच्या दरांमध्ये अचानक वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचं आर्थीक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
नाशिकमधून दररोज १०० ते १२५ वाहने भाजीपाला घेऊन मुंबई आणि उपनगरांमध्ये दाखल होतात. त्यामुळं शहरांत कृषिमाल विकताना डिझेल खर्चाचा भार किमतीतून वसूल केला जाईल, असं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने म्हटलं आहे.
डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे.