'देवदास'.. भारतीय सिनेमातलं एक मानाचं पान... हा एव्हरग्रीन सिनेमा जो तीन पिढ्यांनी त्यांच्या काळातील अभिनेत्यांच्या रुपात अनुभवला आहे. थोर बंगाली साहित्यिक शरतचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहलेल्या देवदास या कादंबरीवर आधारलेला हा सिनेमा आहे. त्यांची आणखी एक अजरामर कलाकृती म्हणजे 'शेष प्रश्न'. १९३१ साली लिहलेल्या या कादंबरीविषयी 'वाचलेलं.. आवडलेलं' या सत्रातून लेखिका दीपा देशमुख आपला अनुभव मांडणार आहेत.. नक्की पाहा...