सई ताम्हणकरच्या “श्रीदेवी प्रसन्न “ या चित्रपटाचा डिजिटली ट्रेलर प्रदर्शित...

सई-सिद्धार्थच्या भन्नाट जोडीची सर्वांना प्रतीक्षा....;

Update: 2024-01-13 11:09 GMT

 सई ताम्हणकरच्या “श्रीदेवी प्रसन्न “ या चित्रपटाचा डिजिटली ट्रेलर प्रदर्शित...

सई-सिद्धार्थच्या भन्नाट जोडीची सर्वांना प्रतीक्षा....

टिप्स मराठी प्रस्तुत व राजकुमार तैरानी निर्मिती "श्रीदेवी प्रसन्न, चित्रपटाचा डिजिटल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मराठीतील बोल्ड अँड ब्यूटीफुल अशी सई ताम्हणकर ही श्रीदेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तर मराठीतील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर हा चित्रपटात प्रसन्न ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे.


ट्रेलरमध्ये सिद्धार्थ व सईची जोडी धम्माल करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच श्रीदेवी ही चित्रपट वेड्या,फिल्मी म्हणाव्या अशा कुटुंबातील मुलगी, त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही श्रीदेवीच्या नावाप्रमाणेचं अगदी फिल्मी अशी असतात, अशा कुटुंबात वाढलेली श्रीदेवी, तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही लव मॅरेज या संकल्पनेवर दांडगा विश्वास त्यामुळे त्यांना अरेंज मॅरेजचे वावडे ,तर एका सर्वसामान्य घरातील मुलगा प्रसन्न, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मुलगा वयात आला की त्याच वेळेत लग्न होणे ते लग्न न केल्यामुळे मुलगा वाया जातो की काय अशी घरातल्यांची एकंदरीतच भीती त्यामुळे वयात आलेल्या प्रसन्नच्या मागे लग्न कर लग्न कर असा ससेमिरा लावणारे त्याचे कुटूंबिय. अशा वेगळ्या कुटुंबातून आलेल्या श्रीदेवी आणि प्रसन्न यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवर होते त्यानंतर दोघे एकमेकांना भेटतात व त्यानंतरची भन्नाट धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे..

श्रीदेवी आणि प्रसन्न धम्माल जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही हा या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना लक्षात येते.

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून सई आणि सिद्धार्थची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना प्राप्त होणार आहे. सई-सिद्धार्थच केमिस्ट्री चित्रपटाचे संवाद प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.




 


विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून सुलभा आर्या या सईच्या फिल्मी आज्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत त्याचबरोबर सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखिका अदिती मोघे यांनी हा भन्नाट मनोरंजनपूर्ण चित्रपट लिहिला असून, मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या डिजिटल ट्रेलर ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार याची उत्सुकता असणार आहे .

Tags:    

Similar News