राज्यात येत्या काही महिन्यात हजारो ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका होऊ शकणार नाहीत. त्यामुळे सरकारने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय़ घेतला आहे. पण एप्रिल-मे महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारने नेमलेले प्रशासक नियमित येत नसल्याने मुदत संपल्यावरही गावकरी कामांसाठी माजी सरपंच आणि सदस्यांनाच संपर्क साधत आहेत. एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या आणि ऑगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच छाया खंदारे आणि सुमन थोरात यांच्याशी संवाद साधला आहे पत्रकार साधना तिप्पनाकाजे यांनी..
पाहा हा व्हिडीओ.....
https://youtu.be/oLfu9NjAlFQ