1 ऑगस्ट म्हणजे मुस्लीम महिलांच्या हक्काचा दिवस... मुस्लीम महिलांना तीन तलाक या प्रथेतून मुक्तता मिळणारा कायदा मंजूर करण्यात आला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 18 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक प्रथा असंवैधानिक म्हणून घोषित केल्यानंतर, मोदी सरकारने 1 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत तीन तलाक प्रथा रद्द करण्याच्या विधेयकास कायद्याचे रुप दिले. यंदा या दिवसाचं दुसरं वर्ष... परंतु या दोन वर्षात मोदी सरकारने केलेला हा कायदा कागदावरचं राहिला आहे का? तीन तलाक कायद्यात नेमक्या काय त्रुटी आहेत? कोणते बदल या कायद्यात होणं गरजेचं आहे? या कायद्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जाते का? तीन तलाक कायदा अंमलबजावणीमुळे कुचकामी ठरतोय का ? यासंदर्भात मॅक्सवूमनच्या टीमने मुस्लीम महिला आंदोलनातील डॉ. नूरजहान सफयानियाज यांच्याशी बातचीत केली. पाहा काय म्हणतायेत डॉ. नूरजहान....