तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का की, तुम्ही कोणतेही फूड पॅकेट खरेदी केलं तर त्या पॅकेटवर तुम्हाला लाल आणि हिरवा यापैकी कोणताही एक डॉट दिसेल. नक्की हे लाल आणि हिरव्या डॉट ची भानगड काय आहे? या लाल आणि हिरव्या डॉटचा नक्की अर्थ काय आहे? चला पाहुयात..
खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर असलेल्या त्या लाल आणि हिरव्या ठिपक्याचा अर्थ आहे की, तो पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी.. जर त्या वस्तूवर लाल रंगाचा ठिपका असेल तर ती वस्तू मांसाहारी आहे आणि जर ठिपका हिरव्या रंगाचा असेल तर ती वस्तू शाकाहारी आहे. म्हणजे ग्राहक खरेदीसाठी जातो त्यावेळी त्या पदार्थात काही मांसाहारी पदार्थ आहेत का? असतील तर लाल ठिपका नसेल तर हिरवा जेणेकरून प्रत्येक ग्राहकास आपण जी वस्तू खरेदी करत आहोत ती शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे समजावं यासाठी हा लाल आणि हिरवा ठिपका असतो.