लॉकडाऊनच्या काळात बीडमध्ये सलग दुसरं हत्याकांड घडलंय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं महिला सुरक्षा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पतीने संशयावरुन पत्नीची आणि मुलाची दगडाने ठेचून हत्या केली. तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारलं.
कौटुंबिक हिंसाचाराच्या या घटनांना जबाबदार कोण? पटतच नसेल तर विभक्त होणे चांगला मार्ग नाही का? कुटुंबव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नवरा बायकोच्या वादात शेवटपर्यंत तडजोडीचा प्रयत्न करतात. पण अशा घटना घडल्या की वाटतं विभक्त झालेलं बरं निष्पाप लेकरांचे जीव तरी वाचले असते अशी भावना राष्ट्रवादीच्या अॅड. हेमा पिंपळे यांनी व्यक्त केलीय. हत्याकांडाची ही मन सुन्न करणारी घटना ऐकल्यानंतर मृतांच्या प्रेताजवळ एकही नातेवाईक नाही असं कळताच त्यांनी दवाखान्यात धाव घेतली. पाहा व्हिडीओ..
https://youtu.be/p0OORzZViTQ