आॅफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप त्रास होत असतो. महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा मिळावी असा कायदा अद्यापही भारतात नाही. स्काॅटलॅंड सारख्या देशात महिलांनी या साठी चळवळ सुरू केली होती. तेथील सरकारने महिलांच्या आरोग्याची काळजी घेत पिरियड प्राॅडक्ट बिल मंजूर केला. महिलांना मासिक पाळी रजा देण्यात आली. स्कॉटलंड सारखा कायदा आपल्या देशात कधी होणार? असा प्रश्न वारंवार केला जातो. परंतु सरकारचं अद्यापही महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे. असं ॲड. हेमा पिंपळे यांनी म्हटलं आहे. काय आहे महिलांच्या मासिक पाळी रजेचा प्रस्ताव? 'पिरियड प्रॉडक्ट बिल' आपल्याकडे कधी ? यासंदर्भात ॲड. हेमा पिंपळे यांनी महिला व बालकल्याण मंत्री आणि सरकारकडे मासिक पाळी रजा मंजूर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पाहा काय म्हणतायेत ॲड. हेमा पिंपळे