उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये आठ पोलिसांचा जीव घेणाऱ्या विकास दुबे याला पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केले. विकास दुबे याने मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोलिसांपुढे गुरुवारी शरणागती पत्करली होती. त्यानंतर रात्री उशिरा उज्जैनमधून उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक त्याला कानपूरसाठी घेऊन निघाले होते. पण कानपूरच्या जवळ आल्यानंतर पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातानंतर विकास दुबने पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पळून जात असताना त्याने पोलिसाची बंदुकदेखील हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मात्र, या एन्काउंटरबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विकास दुबेच्या पत्नीने त्याच्या एन्काउंटर बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे….
“ज्यानं चूक केली त्याला शिक्षा मिळणार, हे मी सांगत आहे. गरज पडल्यास हातात बंदूकही घेईन.” अशी प्रतिक्रिया विकास दुबेच्या पत्नीने दिली आहे.
“आपल्या पतीनं चूक केली होती आणि पोलिसांनी जे काही केलं ते योग्यच केलं,” असंही ती यावेळी ती म्हणाली.