"माझी मुलगी मरण पावलेय, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे"
भंडारा जळीत कांड प्रकरणी एका सिविल सर्जन सह अन्य सहा जणांवर कारवाई करण्यात आली. “याने माझं लेकरु मला परत मिळणार नाही यांना कडक शिक्षा करा” अशी मागणी एका पीडित मातेनं केली आहे.
भंडारा जळीत कांड प्रकरणी सरकारने एका सिविल सर्जन सह अन्य सहा जणांवर कारवाई केली. शासनाच्या या कारवाईवकर आपण एका पीडित मातेने नाराजी व्यक्त केली आहे.
"मी या निर्णयावर समाधानी नाही. माझी मुलगी यात मरण पावलेय. ती काय आता परत येणार नाहीय. या लोकांवर न्यायालयीन गुन्हा दाखल झाला पाहिजे." अशी मागणी मृतक मुलीची आई वंदना सिडाम यांनी केली आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
या समितीने अहवाल राज्य सरकारकडे सोपविल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनीता बडे यांची बदली करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम, परिचारिका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी परिचारिका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. शिवाय बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील अंबादे यांचीही सेवा समाप्त करण्यात आली.