आदिवासी पाड्यातल्या घराघरांत शिक्षण पोहोचवणारी सरस्वती

जळगावच्या एरंडोल तालुक्याजवळचं गालापुर हे एक अगदी छोटसं गाव. याच गावात डोंगरावर ही आदिवासी वस्ती आहे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांकडे रहायला साधी पक्की घरं नाहीत तर शिकायला मोबाईल कुठून येणार... अशावेळी इथल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला आल्या सरस्वतीच्या उपासक जयश्री पाटील.... कोण आहेत या जयश्री पाटील चला पाहूयात;

Update: 2020-10-11 02:00 GMT

लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झालं. शाळा बंद झाल्या. अगदी परिक्षाही रद्द झाल्या. यावर उपाय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात केली. यात खरा प्रश्न निर्माण झाला तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा. आजही अनेत गावांत, आदिवासी भागांत अन्न, निवारा, दळणवळण, लाईट या मुलभूत सुवीधां पोहोचलेल्या नाहीत. अशा परिस्थीत मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्ट फोन असणं म्हणजे दुरची गोष्ट.

अशा वेळी ग्रामीण भागातील मुलांच्या मदतीला येतात ते सरस्वतीचे सेवक शिक्षक. अशाच शाळेच्या बाई आहेत ज्यांचं नाव आहे जयश्री पाटील. जयश्री पाटील या जळगाव जिल्ह्यातील गालापुर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेत शिक्षीका आहेत. जळगाव जिल्ह्यातील एरोंडा तालुक्यातील गालापुर हे डोंगराळ भागातील आदिवासी वस्तीचं छोटंसं गाव. वस्तीवर लोकांना रहायला पक्क घर नाही तिथं शिकायला मोबाईल कुठून येणार? अशा वेळी पुढं येतात त्या जयश्री पाटील यांच्या सारख्या शिक्षीका.

"सुरुवातीला आम्ही ऑनलाइन पध्दतीने शिकवण्याचा प्रयत्न केला. पण, अनेक पालकांकडे मोबाईल नाहीत त्यात रेंज चा प्रॉब्लेम त्यामुळं शिकवायला अडचणी येवु लागल्या. त्यातुन घर घर शाळा ही संकल्पना सुचली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली." असं जयश्री सांगतात. "यात आम्ही प्रकल्प पध्दती प्रायोगीक पध्दती आणि मनोरंनात्मक अध्यायन या पध्दतींचा वापर करुन पाहिला. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये हा आमचा मुळ उद्देश होता तो आता थोड्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे समाधान आहे." "या उपक्रमात पालकांचा प्रतिसाद आम्हाला खुप महत्वाचा होता. आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी चांगला प्रतिसाद दिला." असंही जयश्री सांगतात.

या भागात फक्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल आणि कालु पवार यांचेकडे मोबाईल फोन असल्याने त्यांची वस्तीवर शिक्षण मित्र म्हणून नेमणूक प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने किशोर पाटील यांनी केली. आणि दररोजचा प्राप्त अभ्यासक्रम त्यांच्या मोबाईल वर टाकून सर्वान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामधील नेटवर्कमुळे येणारी अडचण लक्षात घेता त्यांनी स्वतः आदिवासी वस्तीवर जाऊन 'घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी' हा प्रयोग राबविला.

"वाट बघत मुलही अगदी तयारीत असतात. आम्ही गेल्यावर लगेच अभ्यासासाठी खाट टाकतात. कोरोना काळातही या मुलांची शैक्षणीक प्रगती आम्ही थांबू दिली नाही या गोष्टीचं समाधान वाटतं." असल्याचं जयश्री पाटील यांनी सांगीतलं. शेवटी ते म्हणातात ना देश घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यांच्याच योग्य संस्कारातून एखादा अब्दुल कलाम बनतो तर कुणी सचिन तेंडूलकर. त्यामुळे जयश्री यांच्या याच धडपडीतुन उद्या देशाला आणखी एखादा कलाम मिळेल अशी आशा...

- आत्माराम गायकवाड

Tags:    

Similar News