महाभारतावर बोलताना आपण नेहमीच ऐकतो की, व्यासांनी संपुर्ण जग हे उस्ट केलं होतं. म्हणजेच त्यांच्या लेखणीने महाभारतात सर्वच विषयांना स्पर्श केला होता. त्यांनी उभी केलेली एकलव्याची व्यक्तीरेखा आजही सगळीकडे आहे.
हा एकलव्य कधी जात, कधी रंग तर कधी वर्ण या सगळ्यांमधून आपल्याला भेटत राहते. रोज असे नविन एकलव्य निर्माण होत असतात. विशेषत: शिक्षण क्षेत्राकडे बघीतलं की लक्षात येतं, ही गोष्ट जूनी झालेली नसुन आजही घडतेय.
आयुष्यात लाचार होणारे द्रोणाचार्य आपण जोगोजागी बघतोय. आणि योग्यता असूनही संधी न मिळालेले एकलव्यही प्रत्येक पावलावर आपल्याला भेटत राहतात.
द्रोणाचार्यांनी आपल्याजवळच्या विद्येचं दुकान थाटलं होतं. त्यांचा माल शक्तीशाली, सत्ताधाऱी लोकांनी उचलला. आणि तेच लोक ज्ञान कसं असावं कुणी घ्यावं हे ठरवायला लागले. धर्मज्ञान तर ब्राम्हणांनी आपली मिरासदारीच बनवली. आणि धर्म सागराचं अंधश्रध्दांच्या डबक्यामध्ये रुपांतर झालं.
जातिधर्मावरून उपेक्षित झालेल्या, प्रस्थापितांचा बळी ठरलेल्या बुद्धिमान, कर्तृत्ववान, विनम्र, स्वाभिमानी अशा तेव्हाच्या आणि आताच्या अनेक एकलव्यांची गोष्ट. सांगताहेत लेखिका दीपा देशमुख.
https://youtu.be/DJ6yVyaHdLQ