सातारा: सातारा जिल्ह्यात सुरूवातीला १००० कोरोना रुग्णांची संख्या ही कमी गतीने होत गेली. मात्र पुढचे १००० रुग्ण अगदी झपाट्याने वाढले आणि यामुळेच प्रशासनाला कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून केलेल्या वर्तनाचा हा परिणाम आहे. आजपासून सातारा जिल्ह्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनचे सगळ्या नागरिकांनी पालन करणे गरजेचं आहे.
“या कोरोनात आपल्या साताऱ्यातील कुणी बळी पडू नये असं जर वाटत असेल तर, आपल्यातल्या प्रत्येकाने नियम पाळावेत. तुमच्यासाठी प्रशासन सज्ज आहेच. तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सहकार्यासाठी आणि प्रसंगी तुम्हाला तुमच्या घरिच थोपवण्यासाठी प्रशासनही सज्ज आहे.” अशी प्रतिक्रीया सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.
https://youtu.be/lSzd9z_-Z3Y