पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच शासकीय अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पाडत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशीच काही कामगिरी महावितरणच्या कर्मचाऱ्याने केली आहे. महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने पूराच्या पाण्यातून पोहत जाऊन १२ गावांचा खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याच सोशल मिडियावर कौतुक होत आहे.