महिलांचं नेतृत्व आणि त्यांच्या संघर्षाच्या काही अनोख्या कहाण्या ऐकण्यासाठी नक्की पाहा #maxwomanconclave
सध्या माध्यमांमध्ये महिलांविषयक कार्यक्रमांचे स्थान किती याचे उत्तर फार समाधानकारक नाही. माध्यमांमध्ये महिलांचे स्थान फक्त फेस व्हॅल्यू पुरतेच उरले असताना, अशा परिथितीत सातत्याने महिलांविषयक काम करणारं एकमेव माध्यम म्हणून MaxWoman मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून गगनभरारी घेतलेल्या महिलांचा मॅक्स वूमन आयोजित आणि महाचहा प्रस्तूत मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये सन्मान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कवयित्री आतिकी फारुखी, सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे अशा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या संघर्षातून निर्माण झालेल्या रणरागिणींच्या यशापाठीमागची संघर्षमय कहाणी आम्ही घेऊन येत आहोत. पाहायला विसरू नका…