‘तीनदा पेरणं केलीया पण आज माझ्या जवळ 5 पैशे बी न्हाइत’ विधवा शेतकरी महिलेची कैफीयत

Update: 2020-07-21 04:11 GMT

“तीनदा माझी पेरण झालेय पण आज माझ्या जवळ पाच पैशे बी न्हाइत, भाडं द्यायला बी पैशे न्हाइत. मला कोणती मदत बी न्हाई. माझा मुलगा आनी मी डौर हाणायला लागलीया...” ही व्यथा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील घाटबोरी येथील शांताबाई सोनुने यांची.

‘पतीच्या निधनानंतर आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्यातच नशिबात आलेलं अठराविश्व दारिद्र. तिन एकर कोरडवाहु शेती आहे. पण नांगराच्या बैलाचं भाडं द्यायला ही पैसे नाहीत. मग मुलाच्या खांद्यावर 'जू' जुंपूला आणि रुमणे धरुन शेतात डवरणी केली.’ असं शांताबाई सांगतात. हे सांगताना मात्र शांताबाईंचे डोळे पाणावले.

माझ्यावर तिबार पेरणीचं संकट, त्यात हा कोरोना अशात शेतीवर उपजीविका कशी करायची? या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शांता बाईंनी केली आहे.

https://youtu.be/asbB1Z38MVU

Similar News