Lockdown: नवविवाहीत तरुणीला शुभेच्छा देताना पोलिसांनी वाजवलं ‘हे’ खास गाणं...

Update: 2020-04-30 00:25 GMT

कोरोना व्हायरसमुळे राज्यात चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सामुहिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन लग्नसराईच्या दिवसात ठरलेली लग्न कोरोनामुळे लांबणीवर पडली. मात्र, अशा परिस्थितीतही काही जोडपी पोलिसांच्या आदेशांचं पुर्ण पालन करुन लग्न उरकुन घेतायत.

कोणताही जमाव नाही, पाहुणे राऊळे नाहीत, खानपान नाही, मित्रमंडळी नाही आणि डिजे तर नाहीच नाही. कोणत्याही जल्लोष न करता हे लग्न पार पडलं. या लग्नानंतर नवऱ्या मुलीचे आभार मानत पोलिसांनी तिच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छांचा वर्षावामुळे नववधुही भावुक झाली.. पाहा व्हिडीओ

https://youtu.be/2O1kwsjt1kc

 

 

Similar News