"शेतकरी या देशाचं हृदय आहेत आणि हे सरकार त्यांनाच आतंकवादी म्हणतय"
उत्तर प्रदेशातील किसान पंचायतमध्ये प्रियंका गांधी यांचा आरोप;
गेल्या ९० दिवसांपासून शेतकरी मोदी सरकारतर्फे केला जाणार छळ सहन करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पण जगभर फिरणाऱ्या पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाहीये. नरेंद्र मोदी हे जुन्या काळातील अहंकारी राजांसारखे वागत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील किसान पंचायतमध्ये त्या बोलत होत्या. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या उसाचे दाम द्यायला केंद्राकडे पैसे नाहीत पण पंतप्रधान मोदींनी स्वत:साठी १६ हजार कोटींची २ विमानं खरेदी केली आहेत,असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने इंधनावरील करातून २१ लाख कोटी कमवले आहेत. मग ते पैसे गेले कुठे असा सवालही त्यांनी केला आहे.