कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी उपाय म्हणून सरकारने लॉकडाउन जाहीर केले. मात्र सततच्या वाढत्या लॉकडाउनमुळे उपासमारिची वेळ आल्याचे चैत्यभुमी (Chaityabhumi) बाहेरील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी बोलताना व्यापारी प्रमिला वीरकायदे म्हणाल्या की, “आज तीन चार महिने झाले लॉक डाऊनमुळे सर्व बंद आहे. आमची परिस्थिती खूपच हालाकिची असल्याने आमचे खाण्याचे पूर्णपणे हाल आहेत. आम्हाला आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत आलेले नाही. आमचं हातावरचे पोट असल्यामुळे आम्ही जेव्हा दिवसभर दुकानत बसणार तेव्हाच आम्हाला रात्री खायला दोन घास मिळतात. आमची परिस्थिती बिकट आहे आमच्याकडे कोणी पाहत नाही. अशा काळात काय करणार? आता कुठे तरी सरकारने आमच्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हालाही मदत करावी अशी आमची इच्छा आहे.” अशी प्रतिक्रीया दिली आहे.
हे ही वाचा
कोव्हीड योद्ध्यांना दिलासा, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन सूचना