लॉकडाऊन मुळे गोरगरीब कामगार आणि रोजमजूरांवर उपासमारीची वेळ आली आहेच. सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूही या कचाट्यातून सुटले नाहीत. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू प्राजक्ता गोडबोले (Prajakta Godbole) हीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. साठवलेले पैसे संपल्याने या खेळाडूवर सध्या उसनवारी करून पोटाची खळगी भरण्याचं संकट ओढावलं आहे.
हे ही वाचा...
- निर्मला सीतारमण यांनी सांगितलेल्या पॅकेजचा अर्थ काय?
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 331 कोटी रुपये, पी एम केयर हिशोब देणार का?
- ‘माझा गोपा आमदार झाला’, गोपीचंद पडळकर यांच्या आईची भावनिक प्रतिक्रीया
सिरसपेठ येथील दहा बाय दहाच्या झोपडीत राहणाऱ्या प्राजक्ताचे वडील अर्धांगवायूच्या झटक्यामुळं गेल्या सहा वर्षांपासून अंथरुणाला खिळले आहेत. आई कॅटररकडे स्वयंपाकाचे काम करून परिवाराचे पालनपोषण करते. मात्र, लॉकडाऊनमुळं शहरातील मंगल कार्यालये बंद असल्यानं प्राजक्ताची आईही सध्या घरीच आहे. कमाईचं साधन बंद असल्यानं गोडबोले परिवाराची सध्या उपासमार होते आहे.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/267504997737332/?t=1
प्राजक्तानं देशभरातील अनेक क्रॉस कंट्री आणि मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे इटलीतील 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केलंय. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत तीनं 18 वर्षानंतर सुवर्ण मिळवून दिलं. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची आहे. लॉकडाऊन मुळं स्पर्धा बंद आहेत. होते नव्हते ते जवळचे पैसे संपले आहे. त्यामुळं उधारीवर रेशन दुकानात मिळणारे धान्य आणलं जातं.
प्राजक्तानं नोकरीसाठी खुप प्रयन्त केले. मात्र, तिला यश आलं नाही. त्यामुळं आधीच हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असलेल्या गोडबोले कुटुंबियांवर लॉकडाऊनमुळं उपासमारीची वेळ आलीय. सरकारने आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नोकरी द्यावी अशी विनंती प्राजक्ता गोडबोले हीने 'मॅक्सवुमन'च्या माध्यमातून केली आहे.